Home Cities जळगाव जळगाव समाज कल्याण विभागातर्फे २८ एप्रिल रोजी लोकशाही दिन

जळगाव समाज कल्याण विभागातर्फे २८ एप्रिल रोजी लोकशाही दिन

0
182


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या कार्यालयातर्फे नागरिकांच्या समस्या व अडचणींचे निराकरण करण्यासाठी २८ एप्रिल २०२५ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदौरा समोर, महाबळ रोड, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. या लोकशाही दिनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित नागरिकांच्या विविध अडचणी, प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या जातील आणि नियमानुसार त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव योगेश साटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित काही समस्या असतील, ते या लोकशाही दिनात उपस्थित राहून आपली समस्या मांडू शकतात.


Protected Content

Play sound