हरीविठ्ठल नगरात सुरा बाळगणारा पोलीसांच्या ताब्यात


Crime jalgaon

जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव येथील हरीविठ्ठल नगरात बेकायदेशीरित्या सुरा बाळगणाऱ्या एका 19 वर्षीय तरूणांस रामानंद पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात रामानंद पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संदीप उर्फ शेंड्या बापू पाटील वय-19 रा. हरीविठ्ठल नगर हा लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर लोखंडी सुरा बाळगतांना रामानंद नगरचे पोलीस स्थानकांचे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांच्या निदर्शनास आला. त्यांना सहकारी पो. कॉ.प्रदीप इंगळे, पो. कॉ. राजेश पाटील यांच्यामदतीने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगाची झाडाझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी सुरा मिळून आला. याबाबत पो.कॉ. राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट प्रमाणे रामानंद पोलीसात आरोपी संदीप पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पीएसआय कांचन काळे करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here