अमळनेर येथे आचार संहिता भंग प्रकरणात ७ जणांविरोधात गुन्हे

elction

जळगाव/ अमळनेर  (प्रतिनिधी)  अमळनेर येथे विविध ठिकाणी आचार संहित  भंग केल्या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमळनेर शहरात आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी दोन जणांवर आदर्श आचार संहित भंगचा गुन्हा अमळनेर पोलिसात  दाखल करण्यात आला आहे.   अमळनेर शहरात पंचायत समिती जवळ  बूथ क्रमांक १६६ येथे २०० मीटरच्या आत मोहित विजय सोनावणे व मुकेश रमेश पारधी हे दोघे बूथ लाऊन मतदारांना मतदार यादी क्रमाक व नावाच्या चिठ्या वाटप करतांना आढळले.  तसेच उमेश सतीष सोनार, पठाण काशीफ खान ईस्माईल  हे  कॉंग्रस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रीपाई व मित्र पक्ष आघाडी पक्षाचे उमेदवार गुलाबराव बाबुराव देवकर यांचा फोटो तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह छापून ओळख चिठ्या वाटप करतांना आढळून आले.    याठिकाणी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी भेट देऊन पाहणी केली.  चौघाविरोधात आचार संहिता भंगचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यासोबतच इंदिरा गांधी विद्यालय बूथ क्रमाक १८३ जवळ २०० मीटर  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांचे उमेदवाराचे नाव व फोटो असलेल्या ओळख चिठ्या  वाटप करतांना आढळल्याने तिघां विरोधात आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन नामदेव मिस्त्री, निलेश धनराज चौधरी, सागर महेंद्र बडगुजर इदिरा गांधी विद्यालयजवळ २०० मीटरच्या आत कॉंग्रस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रीपाई व मित्र पक्ष आघाडी पक्षाचे उमेदवार गुलाबराव बाबुराव देवकर यांचा फोटो तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह छापून ओळख चिठ्या वाटप करतांना आढळून आले. गटविकास अधिकारी अजय कुमार कल्याण नष्टे यांच्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पंचायत समिती गट विकास अधिकारी अजय कुमार कल्याण नष्टे यांच्या फिर्यादीनुसार सर्वाविरोधात गुन्हा दाखल कार्यांत आला आहे.

Add Comment

Protected Content