शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री केली जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतंग गल्लीत गुरुवारी ११ वाजता सायंकाळी ७ वाजता कारवाई करत ऋतिक उर्फ गोलू पूरन खिची (वय- २२, रा. पतंग गल्ली, जळगाव) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मकर संक्रातीचा सण जवळ येत असताना या काळात पतंग व मांजाला मोठी मागणी वाढली आहे. त्यात पर्यावरण व जिवीतासाठी धोकादायक असलेल्या नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील पतंग गल्लीमध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने पतंग गल्लीमध्ये पाहणी केली असता ऋतिक खिची हा नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ अक्रम याकूब शेख यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील करत आहेत.