तरूणाच्या उघड्या खोलीतून ३६ हजाराचे तीन लॅपटॉप लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात राहणाऱ्या तरूणाच्या घरातून ३६ हजार रूपये किंमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना २० एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी २५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात विजय राजेंद्र सोनार वय २४ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शिक्षणासह व्यवसाय करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्याने उघड्या खोलीतून सुमारे ३६ हजार रूपये किंमतीचे तीन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विजय सोनार याने सर्वत्र माहिती घेतली परंतू त्याचा लॅपटॉप संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवारी २५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे हे करीत आहे.

Protected Content