हिताची कंपनीतून अल्यूमिनीअमच्या पार्टसची चोरी

धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील हिताची कंपनीतून २ लाख ४३ हजार रूपये किंमतीचे अल्यूमिनीअमचे पार्टस् ट्रकमध्ये भरून चोरून नेल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालक व माल भरणारे कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात हिताची नावाची खासगी कंपनी आहे. या ठिकाणी अल्यूमिनिअमचे पार्टस् बनविले जातात. दरम्यान, बुधवार २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता काही सामान उतरविण्यासाठी ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ४२८०) हा कंपनीत आलेला होता. त्यावेळी ट्रकचालक आणि भाल भरणारे कर्मचारी यांनी कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेले कंपनीच्या मालकीचे अल्यूमिनीअमचे पार्टस् असा एकुण २ लाख ४३ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे स्टोअर किपर यांनी धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालक आणि माल भरणारे कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र बागुल हे करीत आहे.

Protected Content