बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात एकाचे बंद घर फोडून घरातून चांदीचे दागिने, टिव्ही, गॅस सिलेंडर असा एकुण  ४९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याबाबत सोमवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सलीम शाह हुसेन शहा (वय-५५) रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेर गावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून चांदीचे दागिने, एलजी कंपनीचा एलसीडी, इलेक्ट्रिक शेगडी आणि गॅस सिलेंडर असा एकूण ४९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता उघडकीला आला आहे. दरम्यान सलीम शाह यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर सोमवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान पाटील करीत आहे.

Protected Content