Live : लोकसभा निवडणुकीबाबत धरणगावच्या पत्रकारांना वाटते तरी काय ? ( व्हिडीओ )

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघातील लढत निश्‍चित झाल्याने आता खर्‍या अर्थाने रणधुमाळीस प्रारंभ होणार आहे. याबाबत स्थानिक पत्रकारांना नेमके काय वाटते? याचा चर्चासत्रातून घेतलेला हा वेध. आजच्या या चर्चासत्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध कंगोरे आपल्याला राजकीय विश्‍लेषणाच्या माध्यमातून जाणून घेता येतील. त्यात प्रामुख्याने विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांच्यासोबत झालेले घाणेरडे राजकारण, राष्ट्रवादीची मतदारसंघातील स्थिती, उमेदवार बदलामुळे भाजप समोरील संभाव्य धोके, राष्ट्रवादी समोरील आव्हाने, धरणगावमधील दोन नंबरचे धंदे, नागरी समस्या आदी विषयांवर रोखठोक चर्चा होणार आहे.

 

जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर व भाजपच्या आमदार स्मिताताई वाघ यांच्यात लढत निश्‍चित झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळच नव्हे तर सर्वच क्षेत्रांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून आहे. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस् न्यूजतर्फे विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचे मत आपल्यासमोर मांडण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, धरणगाव शहरातील ख्यातप्राप्त पत्रकारांचे मत आपल्याला सादर करत आहोत.

 

या चर्चासत्रात  डॉ. संजीवकुमार सोनवणे (जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक), डी.एस .पाटील (सकाळ),जितेंद्र महाजन (पुण्यनगरी), कल्पेश महाजन (दिव्य मराठी ),  ए.के.पाटील (गावकरी), बी.आर.महाजन (दिव्यमराठी), विजयकुमार शुक्ला (शौर्य मराठी), धर्मराज मोरे (जेष्ठ पत्रकार),विनोद रोकडे (लोकशाही) यांनी सहभाग घेतला. तर या सर्वांना बोलते केलेय लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे प्रतिनिधी भगिरथ माळी व कल्पेश महाजन यांनी.

 

लाईव्ह पहा : लोकसभा निवडणुकीबाबत धरणगाव येथील पत्रकारांचे चर्चासत्र.

 

https://www.facebook.com/bhagirath.mali.50/videos/2365375743693006/

Add Comment

Protected Content