चोरीची मोटारसायकल भुसावळ पोलिसांनी केली मूळ मालकाला परत

 

 

 

 

cd0696be 4883 4caa 97e2 2d9372db1427

भुसावळ (प्रतिनिधी) बाजारपेठ पो.स्टे.चे पोलीस कर्मचारी पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असता ५०,००० रु. किमतीची बजाज पल्सर मोटार सायकल बेवारस आढळून आली. सदर मोटार सायकलचे इंजिन व चेसिस नंबरवरून मोटार सायकल मालकाचा शोध लावला. तेव्हा त्याने सदर मोटार सायकल चोरी झाल्याबाबत दादर नगर हवेली येथील सेलवासा पो.स्टे.ला गुरनं ४४/२०१९ भा.दं.वि कलम ३७९ प्रमाणे दिनांक १६ मार्च रोजी ७.२० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज (दि.३१) सदर मोटार सायकल ही दादर नगर हवेली, सेलवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनखाली शहर पो.स्टे.चे उपनिरीक्षक सूर्यवंशी,पो.ना. किशोर महाजन, पो.कॉ. विकास सातदिवे यांनी पार पाडली.

Add Comment

Protected Content