चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आठ वर्षाच्या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे.

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आठ वर्षाच्या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी आठ वर्षाची चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ ऑक्टोबर रोजी चिमुकलीची आई, वडील व दोन भाऊ शेतात कापूस वेचण्यासाठी त्यावेळी घरी चिमुकली व तिचा लहान भाऊ घरी होते. आरोपी गोरख उर्फ बापु भिमराव सोनवणे (वय-२२) ता. चाळीसगाव याने चिमुकली एकटी घरी असतांना दुचाकीवर घेवून जावून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यांनतर तिला मारहाण करून परत घरी सोडून दिले. चिमुकलीची आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आले. पिडीत मुलीच्या आईने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी गोरख उर्फ बापु भिमराव सोनवणे (वय-२२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित म्हणून गोरख सोनवणे याला अटक करण्यात आली. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सत्र न्यायाधिश डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात चालविण्यात आाला. यात एकुण ९ साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीत मुलगी, तिची आई, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी आणि तपासाधिकारी एपीआय भामरे यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. यात गोरख सोनवणे यांला दोषी ठरवत  विविध कलमांन्वये मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे निलेश चौधरी यांनी कामकाज केले. केस वॉच दिलीप सत्रे तर पैरवी अधिकारी म्हणून देविदास कोळी यांनी परिश्रम घेतले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!