मुलाच्या अपहरणप्रकरणी सहा जणांना जन्मठेप; अमळनेरात खळबळ

e42c160a 13a7 4e9b a6a6 e14ffe1f88cb

अमळनेर (ईश्वर महाजन)। तालुक्यातील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉक्टर निखील बहुगुणे यांच्या मुलाचे 50 लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले होते. संपूर्ण अमळनेर तालुक्यात या गोष्टीमुळे पोलीस प्रशासनपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पार्थ बहुगुणेच्या शोधासाठी कंबर कसली होती. पार्थ बहुगुणे अपहरण प्रकरणात सहाही आरोपींना जन्मठेप शहरात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी.आव्हाड यांनी दोषींना बुधवारी आज शिक्षा सुनावली आहे.

अशी झाली होती घटना
अमळनेर शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निखील बहुगुणे यांचा मुलगा पार्थ याचे 3 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी शिकवणीसाठी गेला होता. रात्री 8 वाजून 30 मिनिटाला आरोपींनी पार्थचे ग्लोबल स्कूल जवळून अपहरण केले होते. भालेराव नगर कुठे आहे, असा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पार्थला आरोपींनी गाडी ओढले होते. सदर वाहन विप्रोमार्गे लडगाव, नांदगाव रस्त्याच्या बाजूने गाडी नेली. त्यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनी डॉ. बहुगुणे यांना मोबाईद्वारे संपर्क साधला होता. तुमचा मुलगा पार्थ आमच्या ताब्यात असल्याचे सांगत अपहरणकर्त्यांनी 50 लाखांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास त्याला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली होती. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी बोलावलेल्या जागेवर डॉ.निखिल बहुगुणे यांनी 10 लाख रुपये घेऊन घटनास्थळी पोहोचले. परंतु अपहारणकर्त्याना पोलिस आल्याची खबर लागल्याने ते तिथून पसार झाले होते. नंतर रात्री साडे अकरा वाजता गलवाडे रस्त्यावर डॉ. बहुगुणेंना अपहरणकर्त्यांनी बोलावले असता ते खासगी गाडीने चालकासह गलवाडे रस्त्यावर गेले. मात्र, त्यावेळी त्याठिकाणी अपहरणकर्ते आलेच नाहीत. दरम्यान, अमळेनर पोलिसांनी शहराला सध्या वाहन आणि साध्या वेशात घेराव घातला होता. त्यावेळी आरोपींना कूणकूण लागताच अमळगाव येथील पुलावर पार्थला एकट्यालाच सोडून अपहरणकर्त्यांनी पळ काढला होता. यानंतर डॉ बहुगुणे यांनी 4 जानेवारी 2017 रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव येथील एपीआय रघुनाथ धारबडे यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या होता. सर्व आरोपींना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

नऊ साक्षीदार तपासले
दरम्यान, सदर खटल्यात सर्व आरोपी कारागृहात असताना सुरू होता. यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पार्थची साक्ष महत्त्वाची ठरली. पार्थने अपहरणकर्त्यांना ताबडतोब ओळखले होते. याबरोबर डॉ. निखिल बहुगुणे ओळख परेड घेणारे निवासी नायब तहसीलदार राजेश अमृतकर, यात वेगवेगळ्या प्रकारचे 18 पंचनामे करण्यात आले होते. त्यातील पंच संदीप भगीरथ सराफ यांचीही साक्ष महत्त्वाची ठरली. तपास अधिकारी विकास वाघ आदींच्या साक्षी झाल्या यात सरकारी वकील किशोर आर पाटील मंगरुळकर व फिर्यादी पक्षातर्फे अॅड.एम.जे.बागुल व अॅड.जी.व्ही.विंचूरकर यांनी काम पाहिले.

पंचांची साक्ष ठरली महत्वाची
यातील सर्व आरोपी शहरात माऊली सुजल अक्वा नावाचा मिनरल प्लांट चालक महेश विनायक खांजोडकर (वय-34), सुनील विनायक बारी (वय-38, रा बालाजीपुरा, झामी चौक), भरत दशरथ महाजन (वय-26, रा.शिवम नगर) जार वाटप करणारा शुभम उर्फ शिवम गुलाब शिंगाने (वय-21, रा.भोईवाडा) हमाली करणारा भटू हिरामण बारी (रा.बडोदा, मूळ अमळनेर रिक्षाचालक), अक्वा गाडीवरील चालक अनिल नाना भिल (वय-22, रा. मरीमाता मंदिराजवळ बहादरपूररोड) यांना येथील जिल्हा व सत्र अतिरिक्त न्यायाधीश व्ही पी आव्हाड, यांनी भादंवी कलम 364 (अ ) प्रमाणे अपहरण केले म्हणून जन्मठेप व तीन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 3 महिने शिक्षा तर कलम 120 म्हणजे कटकारस्थान रचणे हे सिद्ध झाल्याने त्यातही जन्मठेप व 2 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 2 महिने शिक्षा सुनावली आहे.

Add Comment

Protected Content