मुलं पळविणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवेने पालकांमध्ये घबराट

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  जिल्ह्यासह तालुक्यात व इतरत्र मुलं पळविणारी टोळी सक्रीय झाल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. याबाबत पोलीस प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

या संदर्भातील वृत्त असे की, मागील काही दिवसांपासून संपुर्ण राज्यात तसेच जळगाव जिल्हा व यावल तालुक्यात देखील विविध सोशल मिडीयाच्या माध्यमातून  लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. याकरिता सर्वसामान्य नागरीक हा आपल्या मुल बाळांच्या सुरक्षेविषयी अधिक चिंताग्रस्त झाले आहेत.  या सर्व सोशल मिडीया या समाज माध्यमांच्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर स्थानिक पोलीस प्रशासनाने या गंभीर विषयी अधिक काळजी व दखल घेणे हे अत्यंत गरजे आहे. पोलीस प्रशासनाने ग्रामीण क्षेत्रातील गावपातळीवर तर शहरी भागात मोहल्ला पातळीवर मुलं पळविणाऱ्या टोळी विषयी खरचं लहान मुलं पळविणारी टोळी सक्रीय आहे का ?याबाबत नागरीकांना जागृत व सतर्क करणे हे अधिक कर्तव्याचे ठरेल असे तालुक्यातील  नागरीकांचे म्हणणे आहे .

 

Protected Content