चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील दालफळ रोडवरून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन डंपरवर पोलीसांनी कारवाई करण्यात येवून दोन्ही डंपर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी  शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर परिसरात असलेल्या दालफळ रोडवरून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर (एमएच १९ झेड ४९७३) आणि (एमएच १९ झेड ४४२७) शहर पोलीसांनी गस्तीवर असतांना शनिवार ४ जानेवारी रोजी रात्री पकडले. डंपर चालकांकडे वाळू वाहतूकीबाबत कोणतीही परवाना नसल्याचे चौकशी दिसून आले. याबाबत शहरपोलीसांनी दोन्ही डंपर शहर पोलीस ठाण्यात जमा करणत आले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरून रविवारी ५ जून रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात प्रकाश कडू सोनवणे (वय-३०) रा. विदगाव ता.जि.जळगाव, दिपक उर्फ भिला नामदेव कोळी (वय-२८) रा. तानाजी मालसुरे नगर जळगाव,  डंपर मालक पवन सुनिल पाथरवट (वय-२२) , सुनिल बारकू पाथरवट (वय-४२) दोन्ही रा. साकेगाव ता. भुसावळ, अनिल हिरामण पवार रा. साकेगाव ता. भुसावळ आणि जयेश कांतीलाल शहा (वय-५०) रा. जळगाव नाका भुसावळ या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षिरसागर , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.

 

Protected Content