जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकतेच नाशिक येथे लेवा समाज कल्याण (मध्यवर्ती ) मंडळ, नाशिक व विभागीय मंडळ नाशिक तर्फे ‘लेवा झंकार महिला ग्रुप’ बाल, तरूण, ज्येष्ठांतील कला गुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी नृत्य,गायन,वादन आणि फॅशन शोचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेवा महिला झंकार म्हणजे भारतीय संस्कृतीचे उत्तुंग दर्शन असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील याणी केले.
सदर कार्यक्रम नाशिक येथील लेवा समाज अध्यक्ष संजय दादा वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर लेवा समाज अध्यक्ष संजय दादा वायकोळे, मंडळ सचिव अनिल महाजन, नाशिक रोड अध्यक्ष सुरेश जावळे, अरविंद अत्तरदे, राजेंद्र महाजन, रवींद्र झोपे,प्रेरणा बेले, डॉ. केतकी पाटील, अभिनेत्री पूनम चौधरी, मनीषा पाटील, नीता वायकोळे, देवेंद्र राणे, रवी महाजन, दिगंबर धांडे, डी.डी.पाटील, रमेश झांबरे, मनोज अत्तरदे उपस्थित होते .
यावेळी डॉ. केतकी पाटील यांनी मार्गदर्शन करतांना हा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे लेवा पाटीदार समाजाच्या सांस्कृतिक परिपक्वतेचा नजराना आहे. बालगोपाल, तरुण- तरुणी, ज्येष्ठांना आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी चे व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांना संधी मिळते तसेच समाज बांधव एकत्र येतात असे सांगितले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना साठी मनीषा कोलते, भावना सरोदे, प्रिया लोखंडे, सुरेखा महाजन यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा चौधरी यांनी केले.कार्यक्रमास नाशिक व आसपास चे समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. नाशिक व परिसरात ४० हजाराहून अधिक लेवा समाज बांधव वास्तव्यास आहेत.यामुळे गोदावरी फाउंडेशन च्या माध्यमातून समाजासाठी प्रकल्प उभारावा अशी मागणी समाजबांधवानी डॉ. केतकी पाटील यांच्याकडे केली आहे .