Home Cities एरंडोल एरंडोलच्या युवकाचा सौदी अरेबीयात सन्मान

एरंडोलच्या युवकाचा सौदी अरेबीयात सन्मान

0
53


एरंडोल प्रतिनिधी | येथील गांधीपुरा भागातील मूळ रहीवासी तथा सौदी अरेबीयात ‘अल्फनार, गृप ऑफ कंपनीत तांञिक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले दिपक नत्थू चौधरी यांचा तांञिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

२०२१ या वर्षात तांञिक क्षेञात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा कंपनीचे उपाध्यक्ष व सामान्य व्यवस्थापक यांच्या हस्ते सर्वोत्तम, मानाचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या आधीही सन २०१९ मध्ये कंपनीकडून त्यांना याच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

कंपनीच्या विस्तारासाठी वेळोवेळी भरीव योगदान दिल्यामुळे कंपनीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सौदी अरेबीयातील जुबेल जवळील दमाम शहरात समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला.


Protected Content

Play sound