लेवा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

भुसावळ प्रतिनिधी । लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर म्हणजेच एलसीसीआयएच्या वतीने शहरातील प्रभाकर हॉलमध्ये शेतकर्‍यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी व्यापसीठावर एलसीससीआयचे अध्यक्ष रवींद्र चौधरी यांच्यासह व्यासपीठावर डॉ. पवन भोळे, कृषीभूषण नारायण चौधरी, अ‍ॅड. प्रकाश पाटील, माजी आमदार नीळकंठ फालक, पुरूषोत्तम पाटील, रवींद्र चौधरी, शरद चौधरी, ललित वायकोळे, पुरूषोत्तम पिंपळे, अमीत नाफळे, मधुकर चौधरी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी रवींद्र चौधरी म्हणाले की, बदलत्या काळानुसार शेतीतही बदल स्विकारा, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनात वाढ करावी. वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अडचणींवर मात करावी.
बैठकीला लेवा पाटीदार समाजातील शेतकरी व उद्योजक हजर होते.

शरद चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनातून शेतकर्‍यांनी आधुनिकतेची कास धरावी असे आवाहन केले. कृषीभूषण नारायण चौधरी यांनी युवकांनी करिअर घडवण्यासाठी शेतीच्या पर्यायाचा विचार करावा. पालकांनीदेखील युवकांना शेतीतील वेगळे प्रयोग करण्यासाठी स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन केले. तर अमित नाफडे यांनी गट शेतीसाठी १०० शेतकरी एकत्र आल्यास त्यांच्या प्रकल्पाला सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. अवजार, सामूहिक पाणी, कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊससाठी अनुदान मिळते. तसेचच कांदा चाळीसाठी ५० टक्के अनुदान मिळते, याचा फायदा घेण्याचे आवाहन केले.

Add Comment

Protected Content