यावल प्रतिनिधी । तालुक्यातील निमगाव शिवारात पुनश्च बिबट्याचा वावर असल्याचे दिसुन आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून वनविभागाने परिसरातील शेतकरी आणी नागरीकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील निमगाव शिवारातील शेतकरी अरूण जुलालसिंग पाटील हे यांच्या शेतात दिनांक १७ डिसेंबर रोजी नियमीतपणे पिकांना पाणी सोडत असतांना त्यांना आपल्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे मिळुन आल्याने या शिवारातील शेती परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अरूण पाटील यांनी या बाबतची माहीती दुरध्वनी व्दारे तात्काळ माहीती कळविली असता यावलच्या क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.टी. पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर .एस. सोनवने, आणी वनरक्षक ईब्राहीम एस. तडवी यांच्या पथकाने निमगाव शेत शिवारातील पाटील यांच्या शेतात भेट देवुन पाहणी केली असता या शेत शिवारात सुमारे आठ वर्षीय बिबट्याचा पदमार्गाचे ठस्सेअसल्याचे वनविभागाच्या पाहणीत निष्पन्न झाले आहे . वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही .टी. पदमोर यांनी निमगाव व परिसरातील गाव शिवारातील शेतकऱ्यांना सावधान व सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे. बिबटया दिसुन आल्याची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे.