किनगाव येथून ३२ वर्षीय तरूण बेपत्ता; यावल पोलीसात हरविल्याची नोंद

यावल प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून किनगाव येथील ३२ वर्षीय तरूण बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी यावल पोलीसात आईच्या खबरीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

कौटुंबिक वादातून किनगाव येथील ३२ वर्षीय तरूण मध्यरात्री बेपत्ता झाल्याची घटना सोमवार, दि.६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात आईच्या खबरीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी तुषार गोपाळ राणे (वय-३२) असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव असून यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार राणे, आई आशा गोपाळ राणे आणि पत्नी रत्ना तुषार राणे हे वास्तव्याला आहे. तुषार राणे आणि त्याची पत्नी आशा राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौंटुबिक वाद सुरू होता. त्यामुळे तुषार हा तरूण गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता.

रविवार, दि. ५ डिसेंबर रोजी तुषार व त्याची आई आशा हे सोबत जेवण करून झोपले आणि मध्यरात्री तुषार कुणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाला. हा प्रकार सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. परिसरात तुषारचा शोध घेतला असता तो कुठेही आढळत नसल्याने आई आशा राणे यांनी यावल पोलीसात धाव घेवून माहिती दिली. आशा राणे यांच्या खबरीवरून तुषार राणे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.

Protected Content