उद्योजक जितेंद्र पवार कालवश

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील ख्यातनाम दत्त इरिगेशन कंपनीचे संचालक जितेंद्र पवार यांचे आज पहाटे झोपेतच निधन झाले. त्यांच्या देहावसानाने एक कर्तबगार व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

जितेंद्र पवार (वय ५२) हे काल रात्री आपल्या कुटुंबियांसह गप्पा करून झोपले होते. पहाटे चार वाजता योगासने करण्यासाठी सौभाग्यवतीने त्यांना उठविले असता त्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याचे दिसून आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

फैजपूरच्या जे. टी. महाजन कॉलेजमधून अभियांत्रीकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी तेथेच काही दिवस अध्यापनाचे कार्य केले. यानंतर त्यांनी ड्रीप विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तर २००० साली त्यांनी दत्त इरिगेशनची मुहूर्तमेढ रोवली. आज दत्त इरिगेशन ही कंपनी देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये ख्यातनाम आहे. कारकिर्दीच्या ऐन शिखरावर असतांना जितेंद्र पवार यांचे झालेले देहावसान हे अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे. त्यांना लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे आदरांजली.

Protected Content