जितेंद्र पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

एरंडोल प्रतिनिधी । शब्दगंध प्रकाशन औरंगाबाद यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जितेंद्र केवलसिंग पाटील यांना 2020 सालच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

 जळगांव जिल्हयाचे भुषण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सध्या कल्याण मुंबई येथे आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र केवलसिंग पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . Corona काळात  रस्त्यावर राहणारे बेवारस . बेरोजगार. धुणी-भांडी करणारे.हात मजुरी करणारे 700 लोकांना दिवस रात्र जेवण देण्याच कार्य करत होते. तसेच  रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी   ”असेंनिकम अल्बम 30”औषधी  20 हजार लोकांना वाटप करण्यात आले  . ब्लड (प्लाजमा) डोनेशन कॅम्प. Corona या आजाराविषयी Online जनजागृती व  Social Distancing पेंट करून  किराणा दुकानात. A T M जवळ.भाजी पाला चा हात गाडी लोकांना लांब लांब उभे करण्यात आले.Corona काळात गरजूंना हॉस्पिटल साठी  मदत करणे, लोकांच्या समस्या सोडवणे हा मानवतावादी दृष्टीकोण अंगीकारून हे प्रयत्न करत असे तसेच  श्री जितेंद्र पाटील हे मुंबईतील नामांकित हॉस्पिटल मधून गरीब व गरजू रुग्णांना मोफत किंवा अल्प दरात शस्त्रक्रिया करून देतात, शस्त्रक्रिया करून देण्याचे कार्य गेल्या पाच वर्षापासून ते अविरतपणे  करता आहेत. 

ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईसारख्या शहरातील अत्याधुनिक व अद्यवावत वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे राबवतात व गरीब व गरजू रुग्णांना रोग  मुक्त करण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात,

जितेंद्र पाटील यांना आतापर्यंत शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले असून त्यात तीन पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्टीत पुरस्कार समजले जातात.

आरोग्य सेवेतील या त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना “”डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार “”देऊन सन्मानित करण्यात आले . यामुळे एका उचित व्यक्तींची  सन्मान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ता कडून केलेले  जात आहे.

 

 

 

 

Protected Content