जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील फुलगाव शिवारात गावठी पिस्तूलासह पाच काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने बुधवारी २ जुलै रोजी रात्री ८ वाजता प्रसिध्दीपत्रकातून कळविण्यात आले.
वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलगाव शिवारातील फुलांब फाट्याजवळ एक व्यक्ती दहशत माजवण्याच्या उद्देशाने आपल्या कमरेला गावठी कट्टा पिस्तूल आणि काडतूस सोबत बळगत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांनी बुधवारी २ जुलै रोजी दुपारी २ वाजता कारवाई करत संशयित आरोपी केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव, ता. भुसावळ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७ हजार ५०० रुपये किमतीचा गावठी पिस्तूल व ५ काडतूस जप्त करण्यात आले. यापुर्वी देखील त्याच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.