चाळीसगाव प्रतिनिधी । येथील युवानेते मंगेश चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त शहरात वाचनालये सुरु करण्याचा संकल्प केला असून या संकल्पाप्रमाणे उद्या (दि.१८) शहरात १० ठिकाणी सार्वजनिक वाचनालयांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आदर्श टी हाऊस, स्टेशन रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता, चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सकाळी 9:30 वाजता,
नवीन हिरापूर नाका आदर्श नगरात स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता, हिरापूर रोड, रुद्र हनुमान नगरात रुद्र हनुमान सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सकाळी 10:30 वाचता, पाटणादेवी रोड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता, शिवाजी घाट येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सकाळी 11:30 वाजता, चाळीसगाव स्टेशन रोड, तहसील कचेरी समोर वीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन दुपारी 12:00 वाजता, खरजई नाका, भडगाव रोड येथे महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन दुपारी 12:30 वाजता, येथील बस स्टँड परिसरात धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन दुपारी 1:00 वाजता आणि के.आर.कोतकर कॉलेज समोर, धुळे रोड येथे नरेश महाराणा प्रताप सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन दुपारी 1:30 वाजता करण्यात येणार आहे.