मुक्ताईनगर तालुक्यात होणारा दुषित पाणीपुरवठा त्वरीत थांविण्याची मागणी

dushit panipurwatha muktainagar

मुक्ताईनगर प्रतिनिधी । गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुक्ताईनगर शहराला तसेच तालुक्यातील अनेक गावांना होत असलेला पाणी पुरवठा हा दुषित होत आहे. दुषित पाणीपुरवठा त्वरीत थांबवून शुद्ध पाणीपुरवठा होण्याबाबतचे निवेदन मुक्ताईनगर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार व नगरपंचायत विभागाला देण्यात आले.

पूर्णा नदीच्या पात्रामधून मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात इतरही बर्‍याच गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदीला पूर आल्याने ज्या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो. त्या जॅकवेल लगतच पुराच्या पाण्यामुळे नदीत संचार करणारे वन्य प्राणी अचानक आलेल्या पुरात वाहून आले. यामध्ये अनेक हरणे, नीलगाई, जंगली डुकरे यासह पाळीव प्राणी यांचे सडलेले अवशेष वृक्षांचा कचरा व लाकडे वाहून आली. अशा सडलेल्या मलब्यामुळे जॅकवेल जवळ दुर्गंधी पसरलेली आहे. तरीसुद्धा संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरावरील शहराला व अनेक गावांना असे दुर्गंधीयुक्त तसेच घाणेरडा पाणीपुरवठा पिण्यासाठी होत आहे. संबंधित प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे असताना व असा प्रकार संबंधित प्रशासनाला माहीत असतानाही जाणीवपूर्वक नागरिकांच्या जीवनाशी खेळ खेळला जात आहे. नागरिकांना याबाबत कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता पिण्याच्या पाण्याचे वेगळे कुठलेही नियोजन न करता हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आणला जात आहे. अश्या आशयाचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने दिले.

त्याचप्रमाणे अश्या होत असलेले दुषित पाण्याबाबत तात्काळ नागरिकांना पिण्यासाठी न वापरण्याची “दवंडी” देऊन पिण्याच्या पाण्यासाठी काही दिवसांसाठी वेगळे नियोजन केले जावे. व तात्काळ असा सडलेला मलबा हा नदीपात्रातून काढून पात्र साफ करण्यात यावे. तसेच या गंभीर प्रकारावर डोळेझाक करणाऱ्या व नागरिकांच्या जीवन जीवाशी खेळ खेळणाऱ्या संबंधित विभागांवर कारवाई करून तात्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा शिवसेना स्टाईलने सदरील मलबा उचलून संबंधित प्रशासनाच्या व आपल्या दालनात भेट म्हणून दिला जाईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अँड.मनोहर खैरनार, माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, राजेंद्र तळेले, युवासेना उपजिल्हाधिकारी पवन सोनवणे, नगरसेवक संतोष मराठे, वसंत भलभले, माजी युवा सेना तालुकाप्रमुख सचिन पाटील, संतोष माळी, मनोज मराठे, प्रफुल्ल पाटील यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेच्या दणक्याने प्रशासन जागी
शिवसेनेने तहसिलदार व नगर पंचायतला निवेदन दिल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी शाम गोसावी, पाणीपुरवठा सभापती निलेश शिरसाठ, माजी सरपंच प्रवीण पाटील हे दुपारी पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ व खामखेडा पुलाजवळ जेसीबीने मलबा काढण्यात आला.

कोट –
मुक्ताईनगर शहर तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी नागरिकांना बिसलरी युक्त पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. बिसलरी युक्त काय? साधे शुध्द पाणीही नगरपंचायत तसेच ही मंडळी देण्यात अपयशी ठरली. मेलेल्या जनावरांचे अवशेष मोठ्या प्रमाणात सडलेल्या अवस्थेत पाण्यात पडलेले आहेत. आणि असेच अशुद्ध पाणी लोकांना पाजून लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.
– चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख.

Protected Content