खुनी हल्लेखोरांची ओळख पटली; पोलिसांकडून कसून शोध सुरू ! ( व्हिडीओ )

death body in civil hospital

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये किरकोळ वादातून तरूणाचा खून झाल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर तरूणांची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, एम.जे. कॉलेजमध्ये आसोदा येथील मुकेश मधुकर सपकाळे (वय २१) हा एम.जे. महाविद्यालयात टि. वाय. बी. ए. या वर्गात शिकतो. तो आज आपल्या रोहीत या लहान भावाचे अ‍ॅडमीशन घेण्यासाठी सकाळी आठ वाजताच काही मित्रांसह कॉलेजला आला होता. साधारणत: दुपारी दीड वाजेच्या सुमारास रोहितने पार्कींगमधून आपली दुचाकी काढली असता मागील दुचाकीचा धक्का त्याच्या दुचाकीला लागला. यानंतर संबंधीत दुचाकी असणार्‍या तरूणाने त्याच्याशी वाद घातला. यातून धक्काबुक्की करण्यात आली. हे सुरू असतांना समोरच्या तरूणांनी चाकू काढून त्याच्यावर वार केले. रोहितने हे वार चुकवले. मात्र तेव्हाच पार्कींगमध्ये आलेल्या मुकेशला त्या तरूणांनी लक्ष्य केले. त्यांनी मुकेशवर चाकूने वार करून तेथून पळ काढला. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुकेशला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याआधीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, जिल्हा रूग्णालयात मृत मुकेश सपकाळे याचे माता-पिता व भावासह आप्तेष्टांनी प्रचंड आक्रोश केला असून येथे शोकसंतप्त वातावरण निर्मित झाले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करेपर्यंत आपण मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. दरम्यान, कॉलेजच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज तपासण्यात आले असून हल्लेखोर विद्यार्थ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांनी महाविद्यालयाचा परिसर आणि जिल्हा रूग्णालयात बंदोबस्त लावला आहे. तर ताजे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणातील तीन आरोपींची ओळख पटविण्यात आली असून यातील एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

पहा : या धक्कादायक घटनाक्रमाचा व्हिडीओ.

Protected Content