गेल्या वर्षभरात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ३६ जवानांच्या आत्महत्या

 

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ३६ जवानांनी आत्महत्या केली आहे. सहा वर्षांमध्ये अशा प्रकारच्या ४३३ घटना घडल्या आहेत. सन २०१८ मध्ये सर्वात कमी, म्हणजेच २८ घटनांची नोंद झाली आहे, सन २०१४ मध्ये सर्वाधिक १७५ घटना घडल्या आहेत.

सन २०१७ मध्ये अशा घटनांची संख्या ६० इतकी होती, सन २०१६ मध्ये ७४ आणि सन २०१५ मध्ये ६० जवानांनी आत्महत्या केली. गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेल्या सीएपीएफमध्ये सात केंद्रीय सुरक्षा दलांचा समावेश आहे. आसाम रायफल्सव्यतिरिक्त, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, सशस्त्र सीमा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डचा समावेश आहे.

२०१९ मध्ये ४३,००० शेतकरी आणि मजुरांच्या आत्महत्या:

सन २०१९ मध्ये सुमोारे ४३,००० शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षाच्या काळात देशभरात एकूण १ लाख ३९ हजार १२३ लोकांनी आत्महत्या केली. ३२ हजार ५६३ रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी जीवन संपवले. एकूण आत्महत्यांमध्ये ही संख्या २३.४ टक्के इतकी होती.

Protected Content