रावेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शहरात 31 लेप्रोस्कोपिक (कॅम्प) शिबीराचे आयोजन आज करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
लेप्रोस्कोपिक शिबीर शहरातील प्रा.आ.केंद्र एनपूर येथील-13, लोहारा येथील-9, वाघोड-4, निंभोरा-3, थोरगव्हाण-2 असे 31 पेशंट यांचा कुटुंब नियोजन शस्रक्रियाचे भव्य शिबीर घेण्यात आले. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी स्वतः शस्रक्रिया केल्यात. त्यांच्या सोबत डॉ. शांताराम ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शिवराय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद ठाकूर, डॉ.विजया झोपे, डॉ.अनुपम अजनसोंडे, डॉ.हेमंत शर्मा, आरोग्य सहाय्यक राम चौधरी, मुख्य अधिपरिचरिका कल्पना नगरे, सहाय्यिका के.जी.बरडे तसेच सर्व प्रा.आ.केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.