देशात कोरोनाच्या तीन लसींवर काम; परीक्षण तिसऱ्या टप्प्यात

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या तीन लसींवर काम सुरू आहे. यांपैकी एक लस आज अथवा उद्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल. याशिवाय, ऑक्सफर्डची कोरोना लस याच आठवड्यात परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना लसीसंदर्भात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले, की “देशात कोरोनाच्या तीन लसींवर काम सुरू आहे. हे काम वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू आहे. यांपैकी एक लस आज अथवा उद्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल. आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत.”

डॉ. व्हीके पॉल म्हणाले, “पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणाले होते, की भारतात तीन लसी तयार केल्या जात असून वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचे काम सुरू आहे. यांपैकी एक आज अथवा उद्या तिसऱ्या टप्प्यावर पोहोचेल. तर इतर 2 लसी परीक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत.”

आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की “आतापर्यंत देशात एकूण 3 कोटीहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत जवळपास 9 लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने सांगितले, की आतापर्यंत जवळपास 19 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर मृत्यू दर 2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.”

Protected Content