जिल्ह्यात लॉकडाऊन : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व आस्थापना पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार असल्याचे निर्देश रात्री उशीरा जारी केले आहेत. यामुळे आजपासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झालेला आहे.

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आज देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी यात सहभागी होण्याची आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले होते. त्यांनी जळगावात रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन केले. यानंतर त्यांनी रात्री उशीरा नोटिफिकेशन काढून जिल्ह्यात सोमवारपासून पुढील सूचना येईपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आज जनता कर्फ्यु असल्याने हा लॉकडाऊन आजपासूनच सुरू झालेला आहे.

दरम्यान, किराणा दुकाने, हॉस्पीटल्स, औषधी दुकाने, पॅथॉलॉजी लॅब्ज आदींना या लॉकडाऊनमधून सुट दिलेली आहे. हा अपवाद वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content