ललवाणी परीवाराची पालीताना संघ यात्रा

lalwani family bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । येथील ललवाणी परिवाराने नुकतीच पालीताना संघ यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली असून यात सुमारे १०० सदस्य सहभागी झाले.

याबाबत वृत्त असे की, येथील श्री श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष मदनलाल ललवाणी यांचा नातु व कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डी. एम.ललवाणी यांचा जेष्ठ सुपुत्र सुयश ललवाणी व सौ.वर्षा ललवाणी यांनी जैन धर्मिय प्रसिध्द तिर्थक्षेत्र व श्रध्दास्थान पालिताना व पंचतिर्थ(पाच धार्मिक तिर्थ) अशी संघ यात्रा ठाणा टु पालीताणा याचे यशस्वी आयोजन केले. यात जवळपास १०० भक्तांना तिर्थयात्रा घडविण्यात आली.

पालीताना येथील पर्वतावर आदेश्‍वर भगवानाची भव्यदिव्य मुर्ती व मंदीर असून हे जागृत देवस्थान आहे. तसेच नवटुक व अनेक मंदिरे आहेत. याच्या दर्शनासाठी जवळपास ४००० पायर्‍या चढाव्या लागतात. ही चढाई फार कठीण आहे. यात वयस्कर व बालकांसाठी डोली वापरली जाते. मात्र या तिर्थयात्रेची विशेष बाब म्हणजे ८ वर्षीय चि. मनीत व ८५ वर्षीय मदनलाल ललवाणी या दोघांनीही डोलीचा सहारा न घेता हे अंतर पायीच पादाक्रांत केले.इतकेच नव्हे तर ललवाणी कुटुंबातील चार पिढ्या म्हणजेच मदनलाल, दिलीपकुमार, सुयश व मनीत यांनी एकाच वेळी पायी चढुन दर्शनाचा लाभ घेतला व पुजा केली.

या प्रसंगी भक्ती संगीत,संघ पुजन आदी कार्यक्रम सुध्दा संपन्न झाले. याच ठिकाणी परिवार अभिनंदन सोहळा करण्यात येवुन कर्नावट,गुगलिया,बेदमुथा, लोढा,पांडव ग्रुप,सुयश मित्रगण व परीवारांनी सुयश व वर्षा यांचे कौतुक व सत्कार, सन्मान करुन त्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content