जळगावातून धावली लालपरी…. (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | “विलीनीकरणाच्या प्रश्न न्यायप्रविष्ट असून न्यायालय जो निर्णय घेईल तो सर्वांना बंधनकारक राहणार असून महाराष्ट्रातील संप करणाऱ्या एसटी कर्मचारी बांधवांनी संप मागे घेत कामावर या” असे आवाहन जळगाव आगाराचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी केले.

जळगाव बस स्थानकातून पडली बस बाहेर प्रवासाला निघाली या संदर्भात भगवान जगनोर यांनी संवाद साधला असता ते म्हणाले, “काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतेलेल्या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात असलेल्या सर्व मागण्या जवळजवळ मान्य केल्या आहेत. त्यानंतरही काही शंका असेल तर आपण बोलून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे देखील त्यांनी सांगितले आहे.

विलीनीकरणाच्या प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालय आणि कमिटी जो निर्णय घेईल तो सर्वांना बंधनकारक राहणार असून महाराष्ट्रातील संप करणारे एसटी कर्मचारी बांधव आहेत यांनी सद्सद्विवेक बुद्धीने विचार करत संप मागे घ्यावा असे आवाहन त्यानी केले.

भुसावळ आगारातून बोदवडला आणि यावलला बसेस निघाल्या असून जळगाव आगारातून धुळे, जामनेर, पाचोरा, आणि धरणगाव मार्गे अमळनेर बसेस प्रवासास निघाल्या असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.

 

भाग १

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/693799698181106

भाग २

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5271256192884553

Protected Content