बैल आडवा आल्याने अपघात ; चार जखमी

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीने बहिणीला शिरसोलीहून जळगावला आणत असताना देवकर कॉलेजजवळ बैल आडवा आल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीसह चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील चंदू आण्णा नगरातील रहिवासी आकाश जाधव यांची बहिण भारती गायकवाड यांचे पतीसोबत भांडण झाल्याने तो आपल्या बहिणीला माहेरी घेवून जाण्यासाठी शिरसोली येथे गेले होते. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आकाश हा दुचाकीने बहिणी व दोन भाच्यांना घेवून जळगावकडे निघाला होते. दुचाकीने देवकर महाविद्यालयापर्यंत आले असता, अंधारात एक बैल अचानक रस्त्यावर त्यांच्या दुचाकीसमोर आडवा झाला. अचानक बैल समोर आल्याने आकाश यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सर्व जण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दुचाकीस्वार आकाश जाधव यांच्या डाव्या हाताला व पायाला जबर मार लागला आहे. तर चिमुकले आर्यन व राज यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे. बहीण भारती गायकवाड यांना देखील पायाला मार लागला असल्याने गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्कावळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असून याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

 

Protected Content