माजी महापौर ललीत कोल्हे यांना जामीन

जळगाव प्रतिनिधी । बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी कारागृहात असणारे माजी महापौर ललीत कोल्हे यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांना गोरजाबाई जिमखान्याजवळ मारहाण करण्यात आली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. १६ जानेवारी २०२० रोजी रात्री ८.३० वाजता शहरातील गोरजाबाई जिमखाना येथे साहित्या गेले होते. यावेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पिस्तुलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण केली. यात साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. साहित्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांवर प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर जबरदस्तीने वसुली, लबाडीच्या इराद्याने वस्तुची परस्पर विक्री, गैरकायद्याची मंडळी गोळा करुन मारहाण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी माजी महापौर ललीत कोल्हे यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पहिल्यांदा पाच जणांना अटक करण्यात आली असली तरी कोल्हे हे फरार होते. यानंतर त्यांना २७ मे २०२० रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कारागृहातच होते. दरम्यान, त्यांचा मध्यंतरी एकदा जामीन फेटाळण्यात आला होता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे.

 

Lalit Kolhe, lalit kolhe jalgaon, lalit kolhe news, jalgaon ex. mayor lalit kolhe, ex mayor lalit kolhe news, jalgaon news

Protected Content