भुसावळात शिवसेनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा व शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्याना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भुसावळ शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोना ळे नागरिक हवालदिल झाले असताना अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना पोटाचे विकार सुरू झाले आहे. भुसावळ नगर पालिकेवर भाजपाची( नेवे पार्टी ) एक हाती सत्ता असून सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील जनतेला त्रास सोसावा लागत आहे. भुसावळ शहरासाठी ऑक्टोबर २०१७ मध्ये लाखो रुपये अमृत योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला खर्च करण्यात आला. परंतु, आज ३ ते ४ वर्षांनंतरही सत्ताधाऱ्यांना अमृत योजनेचे पाणी जनतेपर्यंत पोहोचवता आले नाही असा आरोप करण्यात आला आहे. भुसावळ शहरात ज्या ११ पाण्याच्या टाक्यानचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले त्या पैकी एक ही पाण्याची टाकी सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आली नाहीं असा टोला लागविण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नागरिकांना मणक्याचे व मानेचे विकार जडू लागले आहेत. येत्या आठ दिवसांत भुसावळ शहरातील खड्डे बुजवा वे व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अन्यथा भुसावळ शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसैनिक व जनतेला सोबत घेऊन भुसावळ नगर पालिकेची प्रतीकात्मक स्वरूपात अंत्ययात्रा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content