भालोद येथे मजुराचा विहिरीत पडून मृत्यू

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील भालोद येथे शेत शिवारातील असलेल्या विहीरीत पडल्याने  बुडुन एका खोदकाम करणाऱ्या मजुराचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर आली असुन याबाबत अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

 

या घटने संदर्भात मिळालेली माहीती अशी की, दारासिंग बाबुराव जाधव , (वय ५० वर्ष रा. मांडवा दिगर तालुका भुसावळ) कामानिमित्ताने भालोद येथे आलेले मजुर हे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भालोद शिवारातील दिलीप चौधरी यांच्या शेतातील विहीरीत आपल्या काही मजुरांसह विहीरीचे  खोदकाम आटोपुन क्रेनव्दारे विहीरीतुन वर येत असतांना विहीरीत पडुन पाण्यात बुडुन मरण पावल्पाची घटना घडली आहे.

दारासिंग जाधव हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत असे ते विहीरीच्या खोदकामासाठी भालोद येथे आले होते. त्यांच्या कटुंबात पत्नी , दोन मुली, एक मुलगा असे परिवार आहे.  जाधव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. पवन जैन यांनी केले असुन, फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात त्यांच्या सोबत काम करणारा मजुर सिद्धार्थ पुरूषोत्तम भालेराव यांच्या खबर दिल्यावर अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

Protected Content