कुसुमताई माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

faizpur

 

फैजपूर प्रतिनिधी । येथील कुसुमताई माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आज शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष पंडित कोल्हे होते. यावेळी पतसंस्था चेअरमन नरेंद्र नारखेडे व व्हा. चेअरमन मनोजकुमार पाटील, चंद्रशेखर चौधरी आणि मुख्याध्यापक तळले सर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना दप्तर व गणवेश वाटप करण्यात आले. याचबरोबर शाळेस सातपुडा अर्बन सोसायटी लक्ष्मी नागरी सोसायटी व देविदास चौधरी पतसंस्थेतर्फे सिंलीग पंखे देण्यात आले. तसेच प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी थोरबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर अभ्यास आणि परिश्रम करा, यापुढे परीक्षेत कॉपी अजिबात चालणार नाही हा उद्देश विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवुन, अभ्यास केला पाहिजे. तसेच मोबाईल व टीव्ही यांचा अतिवापर टाळा व आपले आरोग्य सांभाळा असेही ते म्हणाले. नरेंद्र नारखेडे व चंद्रशेखर चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.

Protected Content