बेमुदत संपाला यावल येथील कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नविन पेन्शन योजना रद्द करून  जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह विविध न्यायायिक मागण्यांसाठी आज गुरूवारी १४ डिसेंबर रोजी पासून  शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळी वरील बेमुदत संप पुकारण्यात आला.  या संपात यावल तालुक्यातील विविध शासकीय कर्मचाऱ्यानी या बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.

राज्य शासनाने नविन पेन्शन योजना रद्द करून  जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह विविध न्यायायिक मागण्यांसाठी आज गुरूवारी १४ डिसेंबर रोजी पासून  शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळी वरील बेमुदत संप पुकारण्यात आला. या अनुषंगाने यावल तालुक्यातील विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. महसुलचे कर्मचारी तहसील कार्यालयातील परिसरात संपाला बसले आहे.  या संपामुळे विविध शासकीय कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास सोसावे लागत आहे. या संपात महसुल कर्मचाऱ्यांच्या संघटना आदीवासी शाळा शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी, भुमी अभिलेख कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, वन विभाग, कृषी विभाग, बालविकास प्रकल्प कार्यालय यांचा या संपात सहभाग आहे.

 

Protected Content