जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार , तीच सावित्री आज जगाची शिलेदार ‘ केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आरुषी सरोदे ,नाताशा पवार ,संस्कृती पाटील , अनुश्री चौधरी या विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची भूमिका साकारून त्यांचे जीवनपट विशद केले तर काही विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणे केली तर काहींनी गीत कविता यांच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे आयोजन कल्पना तायडे , चारुलता वायकोळे , दिपाली चौधरी यांनी केले तर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.