महापालिकेच्या गटारीच्या कामासाठी अवैध वाळूचा वापर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील अयोध्या नगर परिसरातील चिमुकले बालाजी मंदिराजवळ महापालिकेच्या गटारीच्या कामासाठी अवैध वाळूचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका नागरिकाच्या तक्रारीवरून तहसीलदार नामदेव पाटील यांनी संबंधित वाळूच्या साठ्यावर कारवाई करून वाळू साठा जप्त केला आहे.

 

 

याबाबत वृत्त असे की, शहरातील योध्या नगरातील चिमुकले बालाजी मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने गटारीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा ठेका एका ठेकेदाराला देण्यात आला असून त्यानुसार ठेकेदार काही दिवसांपासून या ठिकाणी गटारीचे बांधकाम करत आहे. या गटारीच्या बांधकामासाठी तसेच बेकायदेशीर तसेच अवैध वाळूचा वापर केला जात असल्याची तक्रार या परिसरातील एका नागरिकाने फोनवरून जळगाव तालुक्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांना केली. त्यानुसार तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी राजेश भंगाळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या वाळू संदर्भातला कुठलाही शासकीय परवाना संबंधित ठेकेदार अथवा त्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या काम करत असलेल्या संबंधित व्यक्तीकडे मिळाला नाही. त्यामुळे अवैद्र त्या ही वाळू आणून बांधकाम केले जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सदरची एक ते दीड ब्रास वाळू जप्त केली आहे.

 

या प्रकरणी एका नागरिकांनी तक्रार केली होती त्यानुसार मंडळ अधिकार्‍यांना सांगून संबंधित वाळू साठा जप्त केला आहे. हा वाळू साठा नेमका कुणाचा कोणी आणि कुठून आणला कसा आणला या संदर्भातली चौकशी करण्यात येईल , त्यानुसार महापालिकेला आणि संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येईल. संबंधितांकडून समाधानकारक उत्तरे प्राप्त न झाल्यास कायदेशीर रित्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली आहे.

Protected Content