दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीसोबत निघालेल्या दुचाकीस्वार बापाला भरधाव ट्रकने जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ चिरडल्याची दुदैवी घटना घडली होती. या अपघाताप्रकरणी सोमवारी २ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू दीपक कोळी (वय-४५) रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की , मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राजू कोळी हे कुटुंबासह वास्तव्याला होते. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी हे मोठी मुलगी सोनाली राजू वनखेडे (वय-३०) रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर शनिवारी ३१ डिसेंबर रोजी दुचाकीने जळगावहून निघाले. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच ठार झाले होते. तर सोबत असलेली मोठी मुलगी सोनाली ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे. यावेळी जिल्हा शासकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मलहेलवणारा आक्रोश केला होता. दरम्यान, सोमवारी २ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सोनाली वनखेडे यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.

Protected Content