कोटेचा महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील श्रीमती पी.के.कोटेचा महिला महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रसंगी प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.वी. एस.पाटील, डॉ. जे.वी.धनविच, वाय. डी.देसले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ.रंगनाथन यांचे प्रतिमेला माल्यारपण आणि पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी ग्रंथपाल एस एस पाटील यांनी केले त्यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ग्रंथालय शास्त्राचा प्रचार आणि प्रसार केला.
त्यांचे ग्रंथालय शास्त्रांचे पाच सिद्धांत- १) ग्रंथालय हे उपयोगी आहे. २) प्रत्येक ग्रंथास् वाचक मिळाला पाहिजे.३) प्रत्येक वाचकास ग्रंथ मिळाला पाहिजे. ४) ग्रंथालय सेवकाचा त्याचप्रमाणे वाचकाचा वेळ वाचला गेला पाहिजे. ५) ग्रंथालय हे वाढते युनिट आहे.

या पाच सिद्धांताची जाणीव त्यांनी संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात सुद्धा करून दिली अशा या महामानवास आपण विनम्र अभिवादन करू या.., प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांनी विद्यार्थिनींना वाचनाचे महत्त्व पटवून दिले तसेच जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने डॉ रंगनाथन यांची जयंती साजरी केली, असे मी म्हणेन.
कार्यक्रमास सर्व प्राध्यापक आणि बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विनोद भालेराव, विलास सरोदे आणि किरण बाला जैन यांनी परिश्रम घेतले.

Protected Content