यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केली पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात चिमणी दिवस नुकताच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

 

उत्तर महाराष्ट्रात उन्हाळ्यात उष्णतेची लाट असते. उन्हाळ्यात पक्षांना पाणी व अन्नासाठी भटकंती करावी लागते. पाणी किंवा अन्न न मिळाल्याने अनेक पक्षांचे हाल होत असतात. काही वेळेस मृत्यूही होत असतात. पक्षी वातावरण व निसर्ग यांचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभवतात. पक्षांना कृत्रिम घरटे तसेच पाणी, अन्नाची व्यवस्था करण्यासाठी प्लास्टिक बॉटल व इतर टाकाउ वस्तू पासून घरटे तयार केले तसेच मूठभर धान्य संकलन करून पक्षांसाठी भूतदया दाखवली.

 

यात प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. आर. एस. तडवी व प्रा. मयूर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पक्षांसाठी काय करता येईल? तसेच घरटी व पाण्याची व्यवस्था कशी करावी? याबाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष पाण्याची व धान्याची व्यवस्था करून घेतली. महाविद्यालय परिसरात, बागेत व विविध ठिकाणी पक्षांसाठी पाण्याची व धान्याची व्यवस्था केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. यात प्रीती निळे, कोमल खलसे, मयुरी खंबायत भावना बारी पूजा पाटील दिव्या निळे, दिपक कोळी, अनिकेत पवार आदींनी सहकार्य केले.

 

 

या चिमणी दिवस कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा. एम. डी. खैरनार, डॉ. एस. पी. कापडे, डॉं. एच. जी. भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा आदी उपस्थित होते.

Protected Content