कोरपावली येथील विकासोच्या तोलकाट्याचे लोकार्पण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तोलकाट्याचे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले.

कोरपावली तालुका यावल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने कोरपावली मोहराळा मार्गावर उभारण्यात आलेल्या तोलकाटयाचे लोकापर्ण कार्यक्रम सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या हस्ते तोल काटयाची पुजा करून फित कापुन उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ऍग्रोफ्युल्य फार्मर्स प्रोडूयुसर कंपनीचे संचालक ए. टी. चौधरी, वासुदेव पाटील, पराग शिंदे यांच्यासह कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, कोरपावलीच्या उपसरपंच हमिदाबी पिरन पटेल, महेलखेडीचे उपसरपंच जयंत पाटील, मोहराळा विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन राजेन्द्र महाजन, मोहराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ नंदा महाजन यावल येथील कृषी केन्द्रांचे संचालक सोहन कोळंबे व प्रशांत पाटील यांच्यासह पंचक्रोशितील शेतकरी व व्यापारीसह परिसरातील ग्रामस्थ कार्यक्रमास मोठया संख्येत उपास्थित होते .

याप्रसंगी राकेश फेगडे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केन्द्र शासनाच्या माध्यमातुन सहकार मंत्राल्याचे स्वतंत्र गठन करून शेती व शेतकर्‍यांशी निगडीत विविध विकासाच्या व आर्थिक उन्नतीच्या योजना राबविण्यासाठी सहकार क्षेत्रासाठी विकासाचे दालन उघडले आहे. याचा फायदा संपुर्ण देशाच्या सहकार क्षेत्राला आणी आपल्या देशाचा केन्द्रबिन्दु असलेल्या शेतकर्‍यास होणार असल्याचे प्रतिपादन राकेश फेगडे यांनी केले.

या प्रसंगी तोलकाटा लोकार्पण प्रक्रीयेत व्हाईस चेअरमन सुधाकर नेहते, सौ जयश्री नेहेते, दतात्रय महाजन ,यशवंत फेगडे , वसंत महाजन,शरद पाटील, ललित महाजन ,महेन्द्र नेहेते, इमरान पटेल, सौ. सुलोचना जावळे, सिकंदर तडवी, मिलींद महाजन, विलास महाजन व महमंद पटेल यांनी अतिश्य मोलाची साथ दिल्यामुळेच आपणास या कामात यश मिळाल्याचे देखील चेअरमन राकेश फेगडे यांनी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपास्थितांचे आभार संचालक मिलींद महाजन यांनी मानले.

Protected Content