अमळनेरात महाआरतीतून झाला सामाजिक एकात्मतेचा जागर

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळाने अष्टमी निमित्त आदिशक्तीची भव्य महाआरती आयोजित करून सर्व समाजाच्या प्रतिनिधींच्या सहभागाने सामाजिक एकात्मतेचा जागर घडवून आणला.

न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळाने अष्टमी निमित्त महाआरतीचे केलेले आयोजन हे मोठ्या प्रमाणात लक्षणीय ठरले. यासदर महा आरतीला मुख्य यजमान म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक विजय शिंदे व मान्यवरांची उपस्थिती होती. लक्षणीय बाब म्हणजे मराठा समाज, बोहरी समाज, शीख समाज, खाटीक समाज, मारवाडी जैन, सोनार समाज, तेली समाज, सिंधी समाज, झाबक परिवार, गुजराथी समाज, राजपूत समाज, पटेल समाज, वाणी समाज, कासार समाज, ब्राह्मण समाज, पारेख, परिवार,अग्रवाल समाज, लाठी समाज,पांचाळ समाज आदी लहान मोठ्या सर्वच समाजाचे प्रतिनिधी या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी सर्व महिला भगिनींनी लाल रंगाची साडी तर पुरुष बांधवानी कुर्ता परिधान केल्याने आम्ही सर्व समसमान असा संदेशही यातून दिला गेला.सुरवातीला शुभम महाराज यांनी महाआरती चे महत्व व आरतीची संकल्पना विशद केली.त्यानंतर मनाला अतिशय भावेल अशी श्रध्दापूर्वक आरती पार पडली. महत्वाची बाब म्हणजे आरती प्रत्यक्षात १०१ जोडप्यांची असताना प्रतिसाद वाढल्याने १७१ जोडपी यात मनोभावे सहभागी झाली होती.

आरती नंतर सर्व सहभागीं झालेल्या भाविकांना सती माताजी भक्त महेश राजपूत यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सती माताजी यांच्या प्रतिमेचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते वितरण झाले. यासोबत, ना अनिल पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. महाआरतीतुन झालेल्या या सामाजिक एकतेचे मंत्री अनिल पाटील,पोलीस निरीक्षक विजय शिंदे यासह सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी विशेष कौतुक केले.

न्यू प्लॉट विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या संकल्पनेतून ही महाआरती पार पडली.यासाठी नवरात्रउत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रणित झाबक, उपाध्यक्ष विशाल खिलोसिया, प्रतिक शाह, सचिव केयुर ठक्कर, खजिनदार योगेश पवार यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content