अमळनेरात निरंकारी भक्तांकडून उत्साहपूर्ण रक्तदान शिबीर उत्साहात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा अमळनेरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील धुळे झोन 36-बी अंतर्गत अमळनेर येथील सिंधी काँलनी मध्ये स्थीत संत निरंकारी सत्संग भवन चोपड़ा रोड सिंधी कॉलोनी अमळनेर येथे सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवस आगोदर संपूर्ण अमळनेर गांवात जनजागृती मोटार सायकल रँली करण्यात आली होती.

रक्तदान शिबीराचे उदघाटन परम आदरणीय महेश शिवाजी वाघ जी, संयोजक सेक्टर पाचोरा यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन तसेच फित कापुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान परमध्देय पुजनिय महात्मा हिरालाल पाटील जी, झोनल ईंजार्ज जी यांनी दुपारी सदिच्छा भेट देवून स्थानिक साध संगतला आर्शिवादी प्रदान करून उत्साह वाढला. तसेच स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी संत निरंकारी मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रसंशा करत म्हणाले की मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमात जसे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण , नेत्र तपासणी इ. कार्यात योगदान देत आहे.

अमळनेर शाखेचे मुखी प.आ. श्रीचंद निरंकारी जी यांनी झोनल ईंचार्ज जी व संयोजक साहेबांचे यांचे स्वागत व सत्कार करत संत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले. तसेच यावेळी एकुण ४१ रक्तयुनिट संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी जळगाव येथील रेडक्रॉस रक्त पेढीचे डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते. या विशाल भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी अल्पोपहार ,जेवनाची उचित व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीपणासाठी अमळनेर च्या संत निरंकारी मिशन चे साध संगत सेवादल अधिकारी जी व अमळनेर शाखेचे मुखी प.आ. श्रीचंद निरंकारी जी यांच्या सह सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी सकाळपासूनच आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

Protected Content