चाळीसगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय कोळी महासंघ आणि चाळीसगाव विकास मंचच्या वतीने तालुक्यातील दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून कोळी महासंघाचे अध्यक्ष भाजपचे आमदार रमेश पाटील यांच्या उपस्थितीत याला प्रारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार चाळीसगाव आणि नासिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील सांगवी, तळहोंदा आणि ब्राम्हणशेवगा या अतीदुष्काळी भागात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. भाजप आमदार रमेश पाटील, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेव कोळी, चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे, युवा अध्यक्ष रमेश सोनवणे यांनी गावात भेटी देऊन पाण्याचे टँकर सुरू केले असून पाऊस पडेपर्यंत हे टँकर चालणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागाशी बांधिलकी ठेऊन ट्रॅकर सुरू करण्यात आले आहेत . दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणात असल्याचं आमदार रमेश पाटील यांनी संगीतल. दुष्काळ निवारण्यासाठी सदैव तयार असून, दुष्काळ निवारण्यासाठी सर्वांनी एक व्हावे असे आवाहन आण्णा कोळी यांनी केले. तर कायम स्वरूपी उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी जलयुक्त चळवळ उभी करा. यासाठी गावकरी आणि तरुणांनी पुढे यावं अस आवाहन चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केलं.
यावेळी तळहोंदा येथील सरपंच साहेबराव राठोड, उपसरपंच बाबू भुरा चव्हाण, कृषी सहाययक तुषार खोत, हरचंद किसन मोरे, ब्राम्हणसेवागा येथील सरपंच आशाताई नाना माळी, शांताराम नेरकर , सोमनाथ माळी, सांगवी येथील सरपंच डॉ महेंद्र राठोड, बंडू चव्हाण, सचिन ठाकरे, हिरा जाधव, ज्ञानेश्वर महाजन यांच्या सह स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.