न्हावे येथे जुगार अड्यावर पोलीसांचा छापा; चार जणांना अटक, चाळीसगाव पोलीसांची कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावे तरवाडे रोडजवळील गोल्डन पावभाजी धाब्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी शनिवारी रात्री उशीरा छापा टाकून चार जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील ७ दुचाक्यांसह २ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाला हस्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात विनापरवाना दारूची विक्री होत असल्याची चर्चा गावभर होत आहे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी चर्चा गावात होत आहे. तालुक्यातील न्हावे तरवाडे रोडलगत न्हावे येथे गोल्डन पावभाजी धाब्याजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक संपत आहेर, पो कॉ बिभीषण सांगळे व 4 होमगार्ड कर्मचारी यांनी 19 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11.50 वाजेच्या सुमारास छापा मारून स्वतः च्या फायद्यासाठी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणारे प्रवीण दिनकर पिलोरे, समाधान अशोक पवार, रमेश कौतीक शेलार रा तरवाडे ता चाळीसगाव व ज्ञानेश्वर पितांबर राठोड रा तरवाडे ता चाळीसगाव  यांना ताब्यात घेतले व त्यांच्या कडून 2 हजार 670 रुपये रोख, 52 पत्याचा कॅट, जुगाराचे साधने व 2 लाख 8 हजार रुपये किमतीच्या 7 मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेऊन वरील 4 जनांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याच परिसरात विनापरवाना दारू विक्री होत असल्याचे बोलले जात आहे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Protected Content