जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोंदखेळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार जामनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एकागावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. पिडीत मुलीच्या आईने जामनेर पोलीसात तक्रार दिली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या मुलीला काहीतरी आमिष दाखवून किंवा फुस लावून त्यांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. असे नमुद केले आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.




