Home Cities जळगाव जळगावात ७७ रणरागिणींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे

जळगावात ७७ रणरागिणींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे

0
101


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर युवतींना सक्षम करण्यासाठी पिंप्राळा येथील श्री अष्टभुजा माता मंदिरात आयोजित करण्यात आलेले १० दिवसीय विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. हिंदु जनजागृती समितीच्या ‘हर घर योद्धा’ अभियानांतर्गत २७ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत हे आयोजन करण्यात आले होते.

या दहा दिवसांच्या शिबिरात प्रशिक्षक धनश्री दहिवदकर यांनी ७७ युवतींना लाठीकाठी, निशस्त्र युद्धकला, नानचाकू आणि स्वरक्षणाचे विविध तंत्र शिकवले. केवळ शारीरिक प्रशिक्षणच नव्हे, तर समाजात वावरताना सतर्क कसे राहावे आणि हिंदू धर्माचे महत्त्व काय आहे, यावरही युवतींना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या सांगता समारंभात प्रशिक्षित युवतींनी लाठीकाठी आणि नानचाकूची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

शिबिराच्या शेवटी सर्व सहभागी युवतींना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. यावेळी “आम्ही स्वतः कधीही अत्याचाराला बळी पडणार नाही आणि इतर कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ देणार नाही,” अशी सामूहिक शपथ युवतींनी घेतली.

कार्यक्रमाच्या प्रसंगी नगरसेवक नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या सायली पाटील आणि निखिल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अष्टभुजा माता मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अनिल बाविस्कर यांच्यासह जनार्दन पाटील, विठ्ठल राजोळे, प्रवीण करोडपती, मोतीराम पाटील, भगवत चोपडे, सीताराम चौधरी, लिलाधर खाचणे, अनिल पाटील, किरण पाटील, संजय तायडे, सरकारसिंह राजपूत, शिवाजी कुंभार, संजय नेहेते, रामचंद्र शर्मा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बाविस्कर यांनी केले.

 

 

 


Protected Content

Play sound