केऱ्हाळा खुर्द हत्याकांड : मारेकऱ्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

e7ee3b6c 6146 4a91 856c e685496eb02d

 

रावेर (प्रतिनिधी) चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथील दोन मजूर महिलांचा एकाच वेळी निर्घुण खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली होती. परंतू केऱ्हाळा खुर्द सारख्या छोट्याशा गावात एवढे क्रूर आणि भीषण हत्याकांड कोणी.? व का.? केले याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आता निर्माण झाले आहे.

 

याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथील नसीमा रुबाब तडवी (वय ५०) व शालूबाई गौतम तायडे (वय ५५)  या दोन्ही मजूर महिला सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारस म्हशी व  बकऱ्यासाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, रात्र होऊनही त्या दोन्ही घरी परत न आल्याने त्यांचा शोध घरच्यांकडून केऱ्हाळा व परिसरातील शेत शिवारात सुरुहोता. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परत न आल्याने पुन्हा शेती शिवारात शोध मोहीम सकाळपासून दोन्ही महिल्यांच्या कुटुंबियांकडून व गावातील युवकांकडून सुरु होती. दुपारी साधारण एक वाजेच्या सुमारास खेडी शिवारात महिलांचा शोध सुरु असतांना अचानक युवकांना नासिमाचा मृतदेह केऱ्हाळा बुद्रुक येथील नारायण रामचंद्र पाटील यांच्या तुरीच्या तर शालूबाईचा मृतदेह केऱ्हाळा खुर्द येथील विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तुरीच्या शेतात आढळून आलेत. दोन्ही महिलांचे मृतदेह २० ते २५ फुट अंतरावर पडलेले होते.

 

खेडी शिवारच्या घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षीका भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट देऊन संबधीतांना तपासकामी सूचना केल्या. घटनेचे वृत्त मिळताच पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे,सुनिल कदम,पोलिस कर्मचारी निलेश चौधरी, अजय खंडेराव,सतीष सानप,भागवत धांडे, विजय जावरे, विकास पहुरकर,आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करीत होते. दरम्यान गावक-यांच्या मदतीने दोघा महिलांची शोधा-शोध घेणा-या महिलांचा मृत्यूदेह पाहताच सजंय तायडे व संजु तडवी जागेवर शेतातच बेशुध्द होवून खाली पडले लगेच त्यांच्या सहकार्यानी त्यांना उचलून गावातील दवाखाण्यात नेण्यात आले.

 

मयत नसीबा तडवी (वय 45) शालूबाई तडवी (वय 50) हे दोघं दि 18 रोजी सकाळी 11 वाजे पासुन चारा घेण्यासाठी शेतात जातोय, असे आपल्या घरच्यांना सांगून निघाले होते. सायंकाळी उशीरापर्यंत दोघेही घरी परल्या नाहीत. म्हणून त्यांच्या मुलांनी शोधाशोध सुरु केली. त्यानंतर आज (दि 19) रोजी दोघांची हरविल्याची तक्रार रावेर पोलीस स्थानकात देण्यात आली होती. आज सकाळ पासून त्यांच्या मुलांनी आपल्या मित्रांसोबत पुन्हा शोध सुरु केला. खेडी शिवार मधील दोघांचे मृत्यूदेह सुमारे विस फुटाच्या अंतराव तुरी व कपाशीच्या शेतात पडल्याचे आढळून आले. या बाबतची वार्ता के-हाळा गावत पसरताच खेडी शिवारातील खून झालेल्या घटनास्थळीच्या शेतामध्ये माजी पंचायत समिती उपसभापती महेश पाटील के-हाळा बु सरपंच राहुल पाटील के-हाळा खु सरपंच कुर्बान तडवी,माजी सरपंच विशाल पाटील,धनलाल पाटील,यांच्या सह ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना या खुना बद्दल माहिती दिली.

Protected Content