Home Cities जळगाव खेडी खुर्द जि. प. शाळेत मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर ;...

खेडी खुर्द जि. प. शाळेत मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर ; १२४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

0
38


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लहान वयातच आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने अनामिका प्रतिष्ठान, जळगाव आणि माधव गोळवलकर रक्तपेढी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ मध्ये मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १२४ विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली.

या आरोग्य शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. माधव गोळवलकर रक्तपेढीचे संचालक डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन कमी आढळले, त्यांना सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि पोषक घटकांचा समावेश कसा करावा, तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणती विशेष काळजी घ्यावी, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

हे शिबिर सुरळीत पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शितल चौधरी, राणी काळे, सुनंदा कोळी आणि शिक्षक देविदास पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिबिरात सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच माधव गोळवलकर रक्तपेढीच्या वतीने रामचंद्र पोद्दार व जागृती लोहार यांनी सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पूर्ण केली. सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या या उपक्रमा प्रसंगी अनामिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन नेवे, सचिव प्रमोद माळी, माधव गोळवलकर रक्तपेढीचे संचालक डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, ॲड. संजय सपकाळे यांसह प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी, शाळेतील शिक्षक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, शाळा प्रशासनाने सर्व आयोजक संस्था व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Protected Content

Play sound